या महिलांना मिळणार १५०० रुपये दर महिन्याला : Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply : महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी, महिलासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत, योजनेसाठी अर्ज कुठे करायचा, योजनेबद्दल संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे इ. संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. २१ ते ६० वयोगटातील निराधार महिला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिला, विधवा, घटस्पोटीत महिला इ. प्रत्येक महिन्याला १५०० रुपये मिळणार आहे. यासाठी दरवर्षी ४६००० कोटी ची तरतूद करण्यात येणार आहे. या योजनेची सुरुवात जुलै २०२४ पासून होईल. पात्र लाभार्थी महिलेच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत.

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
शासन निर्णयपहा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना मराठी

राज्यातील महिलांसाठी शासनातर्फे दर महिन्याला १५०० रुपये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून देण्यात येतील अशी घोषणा अर्थ संकल्पामध्ये करण्यात आली. “Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana” महाराष्ट्रातील २१ ते ६० वयोगटातील पात्र महिला लाभार्थीना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमधून १५०० देण्यात येतील असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार घोषणा केली. राज्यातील महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी आरोग्य व पोषण सुधारण्यासाठी राज्य सरकारची महत्वपूर्ण अशी योजना आहे.

Majhi Ladki Bahin Yojana Eligibility Criteria

  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • २१ ते ६० वयोगटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिला, परित्यक्त्त्या, विधवा, निराधार महिला इ.
  • लाभ घेण्यासाठी कौटुंबिक उत्पन्न २,५०,००० रु. पेक्षा कमी असावे.
हे पण वाचा  पॉवर टिलर योजना अर्ज सुरु : Power Tiller Yojana

Majhi Ladki Bahin Yojana Online Apply

योजनेचा लाभ घेण्यसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे, अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याकडे आवश्यक सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे, लाभार्थी ऑनलाईन पोर्टलवरती किंवा मोबाईल App द्वारे अर्ज करू शकतात. तसेच सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र येथे जावून आपला अर्ज भरू शकतात. ऑनलाईन अर्ज सुरु झाल्यानंतर नवीन माहिती दिली जाईल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लवकरच वेबसाईट पोर्टल लॉंच होईल.

Mazi Ladki Bahin Yojana Documents

  • उत्पन दाखला (सक्षम प्राधिकारी) (रु.२.५० लाख पर्यंत)
  • जन्म दाखला/महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • बँक खाते पासबुक
  • योजनेचे अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *