शेळी मेंढी गट वाटप योजना फॉर्म सुरु : Sheli Mendhi Gat Vatap Yojana
Sheli Mendhi Gat Vatap Yojana : शेतकरी म्हटलं कि त्यालाच जोड धंदा म्हणून पशुपालन व्यवसाय. मित्रांनो आपण पण शेळी किंवा मेंढी पालन करण्याचा विचार करताय तर त्यासाठी पशु संवर्धन विभागा अंतर्गत विविध गट वाटप योजने करिता फॉर्म सुरु झाले आहेत.
Sheli Mendhi Gat Vatap Yojana
मित्रांनो जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय शेळी मेंढी गट वाटप करणे हि योजना महाराष्ट्र शासन पशु संवर्धन विभागा मार्फत राबविली जात आहे.आपण यासाठी पोर्टल द्वारे किंवा ॲप द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी संबंधित कागदपत्रे अर्ज करताना अपलोड करावी लागतील.
शेळी गट वाटप करणे यामध्ये १० शेळी व १ बोकड, मेंढी गट वाटप मध्ये १० मेंढ्या व १ नर मेंढा यासाठी लाभार्थी व्यक्तीला लाभ दिला जाईल. हि योजना अनुदानावर राबविली जाणार आहे. अर्जदाराने सर्व खर्च स्वतः करायचा आहे. नंतर अनुदान लाभार्थीला दिले जाईल.“sheli mendhi palan online application”
अनु. जाती/अनु. जमाती प्रवार्गाकरिता करीता शेळी मेंढी गट वाटप करणे – या घटकासाठी ७५% अनुदान असेल व सर्वसाधारण प्रवार्गाकरिता ५०% अनुदान दिले जाईल. लाभार्थीने पोर्टल वरील राज्यस्तरीय – शेळी मेंढी गट वाटप करणे या योजनेसंदर्भातील योजनेची माहिती यामधील शासकीय अनुदान आणि स्वहीस्सा मर्यादा हा टेबल/चार्ट पहावा.“शेळी पालन ऑनलाईन अर्ज 2022”
अर्ज कुठे करावा | https://ah.mahabms.com/ |
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा. |
अर्ज कोण करू शकते. | सर्व प्रवर्गातील व्यक्ती अर्ज करू शकतात. |
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व माहिती.
- अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे , आधार कार्ड, ७/१२, ८अ उतारा, बँक पासबुक, रेशन कार्ड.
- रहिवाशी दाखला, एक फोटो, सही, मोबाईल नंबर.
- अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र असावे, अर्जदार दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
- अपत्य दाखला किंवा स्वयंघोषणा पत्र, प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्र इ. कागदपत्रे असावी.
- शेळी मेंढी गट वाटप योजनेकरिता दिनांक १३ डिसेंबर २०२२ पासून ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत.
- अर्ज करण्याची अंतिम मुदत हि १४ जानेवारी २०२३ पर्यंत आहे. अर्जदारांनी विहित कालावधी मध्ये अर्ज करणे गरजेचे आहे.
योजनेचा कालावधी खालील प्रमाणे.
- अर्ज करण्याची कालावधी हा ३० दिवसांचा राहील म्हणजेच दिनांक १३/१२/२०२२ ते १४/०१/२०२३ या मध्ये अर्ज ऑनलाईन स्वीकारले जातील.
- अर्जदाराची प्राथमिक निवड दिनांक १७ – २१ जानेवारी २०२३ दरम्यान होईल.
- २३ जानेवारी २०२३ ते ३० जानेवारी २०२३ या मध्ये निवड झालेल्या व्यक्तीने कागदपत्रे अपलोड करावी.
- १४ फेब्रुवारी २०२३ रोजी लाभार्थीची अंतिम निवड केली जाईल.