पॉवर टिलर योजना अर्ज सुरु : Power Tiller Yojana
Power Tiller Yojana 2023 : शेती करायची म्हणल कि त्यासाठी आली औजारे यंत्र, यंत्रामध्ये ट्रॅक्टर चा जास्त प्रमाणात वापर केला जातो. तसेच पूर्वी शेतीची कामे करण्यासाठी बैलाचा जास्त प्रमाणावर वापर केला जात होता. त्यासाठी लागणारी औजारे हि मुबलक प्रमाणात असायची.
Power Tiller Yojana; पॉवर टिलर योजना
कालांतराने शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर चा वापर सुरु झाला, आणि शेतीची कामे झटपट होऊ लागली, एका ट्रॅक्टरच्या सहाय्याने दिवस भरातील अनेक कामे जलद गतीने होऊ लागली. शेती संबधित अनेक औजारे/यंत्र तयार होऊ लागली, शेतकऱ्यांना परवडेल असे कमी खर्चात पॉवर टिलर हे यंत्र बाजारात आले. या यंत्राद्वारे शेतकऱ्यांना उस बांधणे किंवा इंतर शेती संबधित कामे विविध कामे करणे सोपे झाले आहे.”Power Tiller Yojana“
- शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविते,
- कर्ज योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना,
- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना,
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना,
- सौर कृषी पंप योजना
अशा अनेक योजना शासन शेतकऱ्यांसाठी राबवीत असते. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते
पॉवर टिलर योजना माहिती
- पॉवर टिलर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना महा डीबीटी पोर्टल वरती नोंदणी करावी लागेल.
- नोंदणी केल्यानंतर अर्जदाराची प्रोफाईल भरावी लागेल म्हणजेच आपली वैयक्तिक माहिती, शेती विषयक माहिती कागदपत्रानुसार भरावी.”Power Tiller Yojana“
- आपण चुकीची माहिती भरल्यास योजनेमध्ये आपली निवड झाल्यानंतर अर्जामधील माहितीमध्ये व कागदपत्रावरील माहितीमध्ये तफावत आढळलल्यास आपला अर्ज बाद केला जाईल. यामुळे अर्ज करताना माहिती अचूक भरावी.
पॉवर टिलरसाठी अनुदान किती मिळेल.
पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना आधार लिंक असलेल्या बँक खात्यात अनुदान दिले जाईल. यासाठी शेतकऱ्यांना आपले आधार कार्ड बँक खात्याशी जोडणे गरजेचे आहे.
- ८ बीएचपी व त्यापेक्षा जास्त क्षमता
- अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ८५,००० रु अनुदान असेल.
- सर्वसाधारण प्रवर्गासाठी ७०,००० रु अनुदान असेल
- ८ बीएचपी पेक्षा कमी क्षमता असेल तर अनु. जा. अनु.ज – ६५,००० रु तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५०,००० रु अनुदान असणार आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.
- आधार कार्ड
- ७/१२, ८अ
- मोबाईल नंबर
- बँक पासबुक