माझी लाडकी बहिण योजना अर्ज व हमीपत्र PDF डाऊनलोड Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Form

Majhi ladki bahin yojana online apply maharashtra

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Form : १ जुलै २०२४ पासुन राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची अंमलबजावणी सुरु झाली, योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला १ हजार ५०० रुपये मिळणार आहेत, यासाठी महिलांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. वय वर्षे २१ ते ६५ वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच त्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

Majhi ladki bahin yojana online apply maharashtra

शासनाने अर्ज करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. अर्जदार लाभार्थी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केद्र किंवा ऑनलाईन सुविधा केंद्र द्वारे करू शकतात. तसेच ऑफलाईन अर्ज अंगणवाडी केंद्रात, ग्रामपंचायत, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये येथे ऑफलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे समान असणार आहेत.

दि. १ जुलै २०२४ पासून अर्ज सुरु झाले असून अर्जाची अंतिम मुदत १५ जुलै २०२४ असणार आहे यामुळे लाभार्थींना अर्ज करण्यासाठी फक्त १५ दिवस असणार आहेत, विहित कालावधीमध्ये आपला अर्ज भरावा. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अद्याप लिंक सुरु झालेली नाही, अर्ज भरण्यासाठी लिंक सुरु झाल्यानंतर अपडेट देऊ. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन अर्जाचा नमुना फॉर्म भरून द्यावा लागेल. (mukhyamantri mazi ladki bahin yojana form pdf) ऑफलाईन अर्ज या लेखामध्ये दिलेला आहे.

Mazi ladki bahin yojana maharashtra online form

मुख्यमंत्री माझी लाडकी योजना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट सुरु झालेली नाही लवकरच वेबसाईट सुरु होईल, तसेच मोबाईल अँप “नारी शक्ती दूत या अँप” द्वारे सुद्धा लाभार्थींना अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लाभार्थीकडे आधार कार्ड, बँक खाते पासबुक, एक पासपोर्ट आकाराचा फोटो, उत्पन दाखला (अडीच लाखांपेक्षा कमी), रेशन कार्ड, इ. कागदपत्रे असणे आवश्यक आहे. ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करण्यास अडचण येत असेल ते ऑफलाईन अर्ज करू शकतात.

कोणत्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार

महाराष्ट्र राज्यातील विवाहित महिला, परित्यक्त्या आणि निराधार महिला व विधवा महिला
अर्जदार महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे आवश्यक
अर्ज करणाऱ्या महिलेचे वय किमान २१ वर्षे पूर्ण ते कमाल ६५ वर्षे

अपात्रता

  • कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन २ लाख ५० हजार पेक्षा जास्त असेल तर
  • कुटुंबातील व्यक्ती आयकरदाता असेल तर (Income Tax भरत असेल)
  • ज्यांच्याकडे ४ चाकी वाहन कुटुंबातील सदस्याच्या नावावर असेल तर आहे (ट्रँक्टर सोडून)
  • ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/कॉर्पोरेशन/अध्यक्ष/उपाध्यक्ष/सदस्य/संचालक असेल तर
  • कुटुंबातील सदस्य विद्यमान माझी आमदार/खासदार असेल तर
  • सदर महिलेने जर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे एक हजार पाचशे (१५००/-) पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर

Similar Posts

7 Comments

Leave a Reply