SIM Card : आपल्या नावावर किती सिम कार्ड आहेत मोबाईलवरून पहा

SIM Card

SIM Card : आपण बऱ्याचदा सिम कार्ड खराब झाल्यानंतर ते टाकून देतो किंवा एखादे सिम “SIM Card” बंद करायचे असेल तर आपण ते तोडून किंवा टाकून देतो. परंतु आपण तसे न करता ते कार्ड कायमस्वरूपी बंद करणे गरजेचे आहे.

हरवलेले सिम कार्ड पुन्हा का घ्यावे?

  • सिम कार्ड घेतल्यानंतर ते काही व्यक्ती कायम वापरीत नाही, काही वेळेस आपण ते सिम कार्ड खराब झाले कि टाकून देतो, आणि नवीन सिम कार्ड “SIM Card” घेतो.
  • बरेच जन डायरेक्ट नवीन नंबर घेतात. तर काही जण पुन्हा तोच नंबर घेतात. यामुळे त्यांना पुढे होणारा त्रास कमी होतो.
  • कारण आपला मोबाईल नंबर हा बऱ्याच ठिकाणी लिंक केलेला असतो. उदा. बँक, आधार कार्ड, इतर शासकीय वेबसाईट वरती आपण नोंदणी करणे, तसेच योजनेचे फॉर्म भरलेले असतात आणि हे सर्व तुमच्या मोबाईल नंबरशी जोडलेले असतात.SIM Card
  • यामुळे आपण हरवलेला नंबरच पुन्हा घेतला पाहिजे. प्रत्येक वेळी आपण नवीन सिम कार्ड घेतल्यानंतर जुने सिम कार्ड नंबर तसेच राहतात.
  • आपण ते कुठेही चेक करीत नाहीत. तर मित्रानो आपण यापूर्वी घेतलेले सर्व सिम कार्ड नंबरची यादी तुम्ही मोबाईल वरून पाहू शकता. तसेच रिपोर्ट हि करू शकता.
[irp posts=”1213″]

आपल्या नावावर किती सिम कार्ड आहेत पहा?

  • सर्व प्रथम आपण (TAFCOP) ची साईट ओपन करावी.
  • वेबसाईट वरती लोड असल्यामुळे ओपन होण्यासाठी काही मिनिटे लागू शकतात.
  • साईट : https://tafcop.dgtelecom.gov.in/
  • खाली फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला स्क्रीन दिसेल.
SIM CARD
SIM CARD
  • प्रथम मोबाईल मध्ये सुरु असलेला मोबाईल नंबर टाका.
  • Request OTP वरती दिलेल्या नंबर वरती एक ओटीपी येईल. तो टाकून Validate करा.
  • तुम्हाला सर्व सिम कार्ड नंबरची यादी पाहायला मिळेल. त्या लिस्टमधील जो नंबर आपला नाही त्याचा आपण Report करू शकता.
  • Report पर्यायावर क्लिक करून त्या नंबरचा आपण Report करू शकता.
[irp posts=”790″]

Similar Posts

Leave a Reply