शेळी मेंढी पालन योजनेसाठी अर्ज केला आता पुढे काय करावे? : Sheli Palan Yojana 2023
Sheli Palan Yojana 2023 : शेळी मेंढी गट वाटप, गाई म्हैस, कुक्कुटपालन योजनेसाठी आपण अर्ज केला असेल तर तुम्हाला पुढे काय करावे हे माहिती असायला पाहिजे. कारण अर्ज केला म्हणजे आता आपले काम झाले असे नाही.
Sheli Palan Yojana 2023
अर्ज केल्यानंतर पुढे काय? शेळी मेंढी गट वाटप, गाई म्हैस, कुक्कुटपालन योजना (नाविन्यपूर्ण योजना 2023) ah.mahabms.com पोर्टल वरती अर्ज करण्यासाठी १४ जानेवारी २०२३ पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली होती. यामुळे योजनेच्या वेळापत्रकामध्ये बदल झालेले आहे.
ज्यांनी ah.mahabms.com साईट वरती गाई म्हैस,शेळी मेंढी गट वाटप व कुक्कुटपालन इ. करिता अर्ज केले आहेत त्यांची प्राथमिक निवड यादी हि १७ जानेवारी २०२३ ते २१ जानेवारी २०२३ (एकूण दिवस ५) या कालावधी मध्ये काढली जाणार आहे.”Sheli Palan Yojana 2023“
महत्वाचे : प्राथमिक निवड यादीमध्ये नाव असल्यास अर्जदाराने आपण ज्या योजनेसाठी अर्ज केला आहे. त्या योजनेसंबधित सर्व कागदपत्रे तयार करावी. कागदपत्रे कोणती लागतात यासाठी ah.mahabms.com साईट वर योजनेची माहिती यामध्ये कागदपत्राची यादी पाहायला मिळेल.”Sheli Palan Yojana 2023“
दिनांक २३ जानेवारी २०२३ ते ३० जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये अर्जदाराने ऑनलाईन ah.mahabms.com वरती कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ऑप्शन ओपन होईल. विहित कालावधीमध्ये कागदपत्रे पोर्टल वर अपलोड करावी.
कागदपत्रे अपलोड केल्यानंतर काय?
अर्जदाराने कागदपत्रे अपलोड केल्यानंतर पशुधन विकास अधिकारी (वि) जिल्हा | पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे मार्फत कागदपत्राची पडताळणी १ फेब्रुवारी २०२३ ते ८ फेब्रुवारी २०२३ या कालावधी केली जाणार आहे.”Sheli Palan Yojana 2023“
कागदपत्रामध्ये काही त्रुटी आढळ्यास अर्जदारास कागदपत्रामधील त्रुटी दूर करण्यासाठी १० फेब्रुवारी २०२३ ते ११ फेब्रुवारी २०२३ – २ दिवसाचा कालावधी देण्यात येणार आहे. पुन्हा १२ फेब्रुवारी २०२३ या तारखेला कागदपत्राची अंतिम पडताळणी केली जाणार आहे.
कागदपत्राची अंतिम पडताळणी झाल्यानंतर १४ फेब्रुवारी २०२३ या दिवशी अंतिम लाभार्थी पात्रता यादी तयार केली जाणार आहे.