तुम्हाला किती रेशन धान्य मिळते मोबाईलवरून चेक करा
रेशन कार्ड वरती प्रत्येक रेशन कार्ड धारकाला धान्य दिले जाते, परंतु ऑनलाईन रेशन कार्ड वरती आपल्याला किती धान्य मिळाले पाहिजे हे प्रत्येकाला माहिती नसते. आम्ही तुम्हाला याठिकाणी आपल्याला किती रेशन धान्य मिळाले पाहिजे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे.
Ration card online maharashtra
आपली रेशन कार्ड वरील आणि ऑनलाईन रेशन कार्ड वरील नावे सर्व आहेत का? हे आपण चेक केले पाहिजे. रेशन कार्ड वरती किती धान्य शासनाकडून किती धान्य मिळते हे आपण मोबाईल वरून चेक करू शकता. म्हणजेच शासनाकडून तुम्हाला किती धान्य मिळते, किती दराने मिळते, प्रती व्यक्ती किती धान्य मिळते, याची सुद्धा माहिती मोबाईल वरती चेक करता येणार आहे.
तुम्हाला रेशन धान्य किती मिळते हे पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
धान्य किती मिळते हे “Ration card online maharashtra” पाहण्यासाठी आपल्या रेशन कार्ड वरती १२ अंकी कार्ड नंबर असणे गरजेचे आहे. रेशन कार्ड वरती हा १२ अंकी नंबर नसेल तर आपण आधार नंबर वरून रेशन कार्डचा १२ अंकी नंबर काढू शकता.
- सर्व प्रथम मोबाईल मध्ये मेरा राशन/Mera Ration हे अँ+प घ्यावे.
- ते सुरु करा नंतर मोबाईलचे लोकेशन सुरु करायचे आहे.
- तुमच्याकडे रेशन कार्ड नंबर नसेल तर आपण Aadhaar Seeding Details हा पर्याय निवडा.
- Ration Card No आणि Aadhaar card No हे दोन पर्याय दिसतील त्यामधून Aadhaar card No वर क्लिक करून आधार कार्ड नंबर टाकून घ्या.
- Submit वरती क्लिक करावे नंतर तुम्हाला लगेच तुमचे राज्य, जिल्हा, योजनेचे नाव, रेशन कार्ड नंबर उदा. 272022———— माहिती दिसेल.
- तेथून आपला रेशन कार्ड नंबर घ्यावा. खाली दिलेल्या साईट वरती हा नंबर टाकायचा आहे.
- https://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp हि साईट ओपन करा.
- चौकोनात आपला रेशन कार्ड नंबर टाका आणि Sub+mit करा. तुम्हाला या महिन्याला किती रेशन धान्य मिळते आहे.याची माहिती मिळेल.
- म्हणजेच तुम्हाला प्रती महिना किती धान्य मिळते तसेच मोफत धान्य किती मिळते याची माहिती पाहायला मिळणार आहे.