पीएम किसान योजना अपात्र शेतकऱ्यांची यादी पहा : PM Kisan Yojana
PM kisan yojana rejected list 2023 : पीएम किसान योजनेचा अनेक शेतकरी लाभ घेत आहेत. तसेच यामध्ये काही व्यक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र असूनसुद्धा लाभ घेत होते. अपात्र शेतकऱ्यांची यादी आपण कशी पाहणार याची संपूर्ण माहिती याठिकाणी दिलेली आहे.
PM Kisan Yojana
मागील काही महिन्यांपूर्वी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करण्यात आली होती. तसेच प्रत्येक लाभार्थीला आपले आधार प्रमाणीकरण (KYC) करणे बंधनकारक केले आहे. यामध्ये बरेच शेतकरी अपात्र आढळून आले आहेत. अशा शेतकऱ्यांना १२ व्या हप्त्याचे २००० रु मिळाले नाहीत.
PM kisan yojana rejected list 2023
पीएम किसान योजनेची अपात्र शेतकऱ्यांची यादी हि https://pmkisan.gov.in/ साईट वरती पाहता येणार आहे. आता आपण आपल्या गावातील किती शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र आहेत व किती शेतकरी अपात्र आहे. याची माहिती आपल्याला पोर्टल पाहता येणार आहे.
अपात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
- मित्रांनो सर्वप्रथम https://pmkisan.gov.in/ हि साईट ओपन करावी.
- PAYMENT SUCCESS च्या खालच्या बाजूला Dashboard हा ऑप्शन आहे. त्या वर क्लिक करा. किंवा डायरेक्ट साईट – https://pmkisan.gov.in/VillageDashboard_Portal.aspx
- नवीन एक पेज सुरु होईल, त्यामध्ये आपले राज्य – जिल्हा – तालुका – गाव सिलेक्ट करायचे आहे.
- Submit वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचा संपूर्ण रिपोर्ट दिसणार आहे.
- Aadhaar Aunthentication Status या पर्यायावर क्लिक करा.
- खाली दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सर्वात शेवटी एक Total Ineligible या टेबल मध्ये अपात्र शेतकऱ्यांची यादी पाहायला मिळेल.