PM Kisan Yojana 2023; गावातील शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले यादी पहा
PM Kisan Yojana 2023 : प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना लाभार्थी शेतकऱ्यांना जर आपल्या अर्जाचे स्टेटस किंवा किती हप्ते मिळाले हे पाहण्यासाठी मागील वर्षी आधार कार्ड नंबरच्या माध्यमातून पाहता येत होते. परंतु आता मोबाईल नंबर किंवा नोंदणी क्रमांक याद्वारे स्टेटस पाहता येते.
pm kisan yojana payment list
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आपल्या गावातील किती शेतकऱ्यांना किती हप्ते/रुपये मिळाले याची यादी आपण मोबाईल वरती पाहू शकता. आपण हि यादी कशी पहायची याची आपण सविस्तर माहिती येथे दिली आहे.
यादी पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
मोबाईल वरती पीएम किसान योजनेची अधिकृत साईट ओपन करावी लागेल. समोरील साईट ओपन करा – https://pmkisan.gov.in/. त्यामध्ये खालील फोटोमध्ये दाखविल्या प्रमाणे Dashboard ऑप्शन निवडायचा आहे
पुन्हा एक नवीन पेज सुरु होईल, त्यामध्ये आपले राज्य, जिल्हा,तालुका, गाव, निवडायचे आहे. नंतर Submit करा.
तुम्हाला Summary, Payment Status, Aadhaar Authentication वरील प्रमाणे पर्याय दिसतील. त्यामधून Payment Status हा पर्याय निवडा. गावातील शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले याची नावानुसार (pm kisan yojana payment list) यादी दिसेल.