PM Kisan Yojana; 2000 रु हप्ता मिळाला नसेल तर हे काम करा
PM Kisan Yojana Installment : पीएम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना १३ व्या हप्त्याचे २००० रु दि. २७ फेब्रुवारी २०२३ ला त्यांच्या बँक खात्यात पाठविण्यात आले आहेत. काही शेतकऱ्यांना १३ वा हप्ता मिळाला नाही. तर काही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा मेसेज आला आहे परंतु त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले. या बद्दल लेखात आपण सविस्तर माहिती दिलेली आहे.
PM Kisan Yojana Installment
पीएम किसान योजनेचा १३ वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यांनी आपण केवायसी केलेली आहे का? हे चेक करावे. केवायसी झालेली नसेल तर केवायसी करून घ्यावी. तसेच पीएम किसान योजनेच्या वेबसाईट वरती अपात्र शेतकऱ्यांची यादी अपडेट झाली आहे. अपात्र यादीमध्ये नाव आहे का हे चेक करा.
योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती स्टेटस चेक करून पहा त्यामध्ये खालील प्रमाणे ऑप्शन असतील तर तुम्हाला १३ वा हप्ता मिळू शकतो.
Aadhaar Demo Authentication Status | Success |
eKYC | Yes |
Payment Mode | Aadhaar |
Land Seeding | Yes |
PM Kisan Yojana
शेतकऱ्यांना जर पीएम किसान योजनेचा मेसेज आला असेल तर त्यांनी सुद्धा स्टेटस चेक करा. स्टेटस मध्ये वरील प्रमाणे ऑप्शन असतील तर त्यांनी आपले आधार कार्ड ज्या बँकेत लिंक असेल त्या बँकेत जाऊन चौकशी करू शकता. आधार कार्ड कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे आपण UIDAI च्या अधिकृत साईट वरती चेक करू शकता.