घरीबसून तलाठी ऑफिसमधील कामे करा : Online Land Record Maharashtra

Online Land Record Maharashtra

Online Land Record Maharashtra : आपण शेतकरी असाल तर आपल्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती आम्ही घेऊन आलो आहोत. आपल्याला कधीही याची गरज पडू शकते. शेती संबधित कागदपत्रे काढण्यासाठी आपल्याला तलाठी कार्यालयामध्ये जावे लागते परंतु आता तुम्हाला प्रत्यक्ष कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही.

Online Land Record Maharashtra

शेती संबंधित बरीचशी माहिती आम्ही या ठिकाणी दिलेली आहे. तुम्हाला जर वारस नोंद किंवा फेरफार, ७/१२ वरील बोजा चढविणे, बोजा कमी करणे, अपाक शेरा कमी करणे इ. साठी तुम्हाला तलाठी कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही. शेतकरी स्वतः मोबाईल वरूनच काही मिनिटामध्ये या सेवेचा लाभ घेऊ शकतात.

[irp posts=”679″]

शासनाने शेतकऱ्यांसाठी अनेक सेवा या ऑनलाईन करून दिलेल्या आहेत. म्हणजेच जुने फेरफार, जुने ७/१२, उतारे, नकाशे यामुळे शेतकऱ्यांना तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयामध्ये जाण्याची गरज पडणार नाही.

तलाठी ऑफिस मधील खालील कामे मोबाईल वरून शेतकऱ्यांना करता येणार.

  • जमिनीची वारस नोंद.
  • एकुमे नोंद कमी करणे.
  • मृताचे नाव कमी करणे.
  • अपाक शेरा कमी करणे.
  • ई-करार नोंदणी.
  • ७/१२ वरील चूक दुरुस्ती करणे.
  • विश्वस्ताचे नाव बदलणे.
  • बोजा चढविणे, किंवा कमी करणे.

वरील कामे आपण घरबसल्या मोबाईल वरून करू शकता. यासाठी शेतकऱ्यांना https://pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin या साईट वरती नोंदणी करावी लागेल. त्याठिकाणी लॉग इन केल्यानंतर ७/१२ यामध्ये सर्व सुविधा पाहायला मिळतील.

वरील सुविधांसाठी ऑनलाईन अर्ज शेतकरी करू शकतात, अर्ज केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे साईट वर अपलोड करावी लगातील.

Similar Posts

Leave a Reply