जमिनीचे जुने सर्व कागदपत्र मिळणार मोबाईलवर : Old Land Records Maharashtra

Old Land Records Maharashtra

Old Land Records Maharashtra : शेतजमिन असो किंवा घराची जागा, जमिनी संबंधित सर्व कागदपत्रे मिळणार ऑनलाईन यामुळे नागरिकांना कागदपत्रासाठी कुठेही जाण्याची गरज पडणार नाही.

Old Land Records Maharashtra

जमिनीचे जुने फेरफार आणि इतर कागदपत्रे लागत असतील तर शेतकऱ्यांना तलाठी किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन काढावी लागत असे. परंतु आता प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. काही महिन्यामध्ये शेतकऱ्यांना शेत जमिनीचे जुन्या सालाचे फेरफार, ७/१२ उतारे, नकाशे इ. कागदपत्रे हे शेतकऱ्यांना ऑनलाईन मिळणार आहेत. हे फेरफार ७/१२ उतारे, नकाशे https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/ या वेबसाईट वरती पाहता येणार आहे.

[irp posts=”902″]

त्याच बरोबर आपल्या शेतीचा नकाशा हा ऑनलाईन बघायचा असल्यास शेतकरी mahabhunakasha या साईट वरती आपल्या शेतीचा नकाशा पाहू शकतात. परंतु हा नकाशा कोणत्याही शासकीय कामासाठी वापरता येणार नाही. फक्त पाहण्यासाठी हा नकाशा साईट वरती उपलब्ध आहे.

City Survey Utara

सिटी सर्व्हे जागेचा उतारा जर तुम्हाला काढायचा असेल तर तो सुद्धा आपण मोबाईल वरून काढू शकता, त्यासाठी तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही.

city survey online सिटी सर्व्हे उतारा हा फक्त पहायचा असेल तर आपण मोफत काढू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. परंतु हा उतारा तुम्हाला कर्ज प्रकरण किंवा शासकीय कामासाठी लागत असेल तर आपण डिजिटल उतारा काढू शकता. ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी वेगवेगळे शुल्क असणार आहे.

City Survey Number Online

सिटी सर्व्हे डिजिटल उतारा काढण्यासाठी तुमच्याकडे उताऱ्याचा नगर भूमापन क्रमांक असणे गरेजेचे आहे. परंतु आपल्याकडे जर नंबर नसेल तर काही महिन्यामध्ये नवीन एक पोर्टल सुरु होणार आहे. त्यावरती आपण नंबर शोधू शकता.

[irp posts=”783″]

सिटी सर्व्हे उतारा जर आपल्याकडे नसेल तर आपल्या जागेवर बँक कर्ज सुद्धा देत नाही. यामुळे सिटी सर्व्हे जागेचा उतारा आपल्याकडे असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याच बरोबर आपली इतर कागदपत्रे हे सांभाळून ठेवली पाहिजे. कारण सर्व कागदपत्रे हे ऑनलाईन होत आहेत.

Similar Posts

Leave a Reply