शासनाचे जुने व नवे शासन निर्णय पहा : Maharashtra Government GR
Maharashtra Government GR : शासन निर्णय म्हणजे काय? हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. तसेच आपण विविध विभागाचे जुने नवे शासन निर्णय मोबाईल वरून कसे पहायचे हे आपल्याला माहिती असावे.“Maharashtra Government GR”
Maharashtra Government GR
आपण बऱ्याच ठिकाणी जी आर हा शब्द वापरला असेल, जी आर म्हणजे नक्की काय?, शासन निर्णय म्हणजे काय? याची आपण सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत. जीआर/GR म्हणजेच Government Resolution यालाच आपण शॉर्ट मध्ये GR/जी आर म्हणतो. Government Resolution म्हणजेच मराठीमध्ये शासन निर्णय होय.
शासनाने एखादा धोरणात्मक निर्णय घेतल्यास त्याचा शासन निर्णय/आदेश काढला जातो. हा आदेश राज्यपाल यांच्या नावाने काढला जातो. याच आदेशाला शासन निर्णय/GR म्हटले जाते.
शासन निर्णय मोबाईलवरती कसे पहायचे?
शासन निर्णय आपण मोबाईल वरून पाहू शकता, तुम्हाला कोणत्याही विभागाचे, जुने किंवा नवे शासन निर्णय काही मिनिटात मोबाईल वरून पाहता येणार आहेत.
- सर्प्रथम मोबाईल मध्ये महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णयाचे पोर्टल ओपन करावे लागेल.
- शासन निर्णय पोर्टल – https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions
- वरील पोर्टल वरती तुम्हाला सर्व शासन निर्णय पाहता येतील.
- तुम्हाला शासन निर्णय हवा असलेला विभाग निवडा, महत्वाचा शब्द यामध्ये तुम्हाला त्या शासन निर्णयामधील माहिती असणार शब्द टाकू शकता.
- कधी पासूनचा कधी पर्यंतचा शासन निर्णय हवा आहे, ती तारीख निवडायची आहे.
- खालील कोड भरून शोधा पर्याय निवडा, आपण निवडलेल्या बाबीतील शासन निर्णय पाहायला मिळतील.
- अशा प्रकारे आपण मोबाईलवरून शासन निर्णय पाहू शकता.