प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजना : Kusum Solar Pump Yojana
Kusum Solar Pump Yojana : तुम्हाला पण शेतीमध्ये सोलर पंप घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, राज्यात लवकरच सौर कृषी पंप योजनेकरिता ऑनलाईन अर्ज सुरु होणार आहेत. यालेखात आपण प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
Kusum Solar Pump Yojana
प्रधानमंत्री कुसुम सोलर (pm kusum yojana) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ९०% ते ९५% अनुदानावर सौर कृषी पंप दिला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकृत वेबसाईट वरती ऑनलाईन अर्ज करावा लागतो. पंपाची क्षमता पूर्णतः शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर अवलंबून असेल.“pm kusum solar pump yojana maharashtra”
शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेमधून शेततळे, बोरवेल, विहीर, बारमाही वाहणारे नदी/नाले यांच्या शेजारील किंवा कोणताही शाश्वत पाण्याचा स्त्रोत असेल तर ३ एचपी, ५ एचपी वअर्ज ७.५ एच पी क्षमता पर्यंत जमीन क्षेत्रानुसार पंप दिला जातो.
- ज्या शेतकऱ्यांची जमीन हि अडीच (२.५) एकर पर्यंत असेल अशा शेतकऱ्यांना ३ HP DC क्षमतेचा पंप दिला जातो.
- तसेच २.५ एकर ते ५ एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना ५ एचपी DC क्षमतेचा पंप दिला जातो.
- आणि ५ एकर पेक्षा जास्त शेतजमीन धारकास ७.५ एचपी DC क्षमता असलेला पंप दिला जात आहे.
सौर पंपाकरिता किती अनुदान असेल.
- वरील सर्व पंप शेतकऱ्यांना ९०% ते ९५% अनुदावर वितरीत केले जातात.
- अनु.जाती/अनु.जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५% अनुदान व सर्वसाधारण प्रवर्गासाठी ९०% अनुदान दिले जाते.
- शेतकऱ्यांना फक्त ५% ते १०% लाभार्थी हिस्सा भरावा लागतो.
अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात.
- आधार कार्ड प्रत, अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा एक फोटो,
- बँक पासबुक प्रत, ७/१२ उतारा,
- शेतजमीन सामाईक असल्यास भोगवटदाराचे २०० रु. मुद्रांक कागदावर ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल.
- विहीर व बोरवेल पाण्याचा स्त्रोत सामाईक असल्यास भागीदाराचे ना हरकत प्रमापत्र/प्रतिज्ञापत्र.
- SC/ST (अनु.जाती/अनु.जमाती) प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र.
- शेतातील शेजारील व्यक्तीचे वीजबिल. (मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतून अर्ज करण्यासाठी)
- अर्जदाराचा मोबाईल नंबर.
योजनेसाठी अर्ज केंव्हा सुरु होणार?
ज्या जिल्ह्यात कोटा शील्लक आहे. तेथे ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. आपण अर्जदार नोंदणी करताना शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण निवडलेल्या जिल्ह्यात कोटा शिल्लक आहे का याची यादी दाखवली जाईल. शेतकऱ्यांनी कोटा शिल्लक असेल तर नोंदणी करावी.“pm kusum yojana documents required”
कारण कोटा शिल्लक असेल तरच शेतकऱ्यांना अर्ज करता येईल. यामुळे कोटा शिल्लक नसेल तर नोंदणी करू नये.
लवकरच योजनेचे नवीन अर्ज भरणे सुरु होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे तयार करून ठेवावी. ७/१२ वरती पाण्याच्या स्त्रोताची नोंद करून घ्यावी. ऐनवेळी धावपळ होणार नाही. शेतकऱ्यांना माहिती पाठवा.