1 वर्ष मिळणार मोफत रेशन धान्य : Free Ration Scheme

Free Ration Scheme

Free Ration Scheme : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी एक वर्षासाठी मिळणार मोफत धान्य. कोरोना काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना हि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना २८ महिने मोफत धान्याचे (Free Ration) वितरण केले गेले.

Free Ration Scheme

रेशन कार्ड धारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत १ जानेवारी २०२३ पासून मोफत धान्य दिले जाणार आहे. ८१.३५ कोटी रेशन कार्ड लाभार्थ्यांना पुढील एका वर्षासाठी मोफत रेशन धान्य मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला आहे.

[irp posts=”745″]

केंद्र सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने (एनएफएस/NFSA) अंतर्गत आणि इतर कल्याणकारी योजनांच्या अनुदानापोटी २ लक्ष कोटीपेक्षा जास्त निधी खर्च करण्यात येणार आहे. यामुळे गरीबांचा आर्थिक ताण नक्कीच कमी होणार आहे. हा ऐतहासिक निर्णय असणार आहे.

योजने मार्फत पुढील एक वर्षासाठी, प्राधान्यक्रमातील घरातील प्रती व्यक्ती ५ किलो धान्य या योजनेअंतर्गत मोफत (Free Ration Scheme) दिले जाणार आहे. आणि अंत्योदय योजने अंतर्गत ३५ किलो धान्य हे प्रती कुटुंब मोफत धान्य दिले जाणार आहे.
[irp posts=”650″]

एनएफएस/NFSA योजने अंतर्गत लाभार्थीला अनुदानित धान्य, तांदूळ प्रती किलो ३ रुपये व गहू २ रुपये प्रती किलो तसेच भरड धान्य १ रुपये प्रती किलो वितरीत केले गेले आहे.

शासन निर्णयपहा
Free Ration Scheme

Similar Posts

Leave a Reply