Flipkart वरून उधार वस्तू/सामान मिळणार : Flipkart Pay Later

Flipkart Pay Later

Flipkart Pay Later : आपण Flipkart वरून उधार समान मागवू शकता, आपण फ्लिपकार्ट वरून शॉपिंग करीत असाल तर तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. डिजिटल शॉपिंग Platform ग्राहकांसाठी वेळोवेळी आपल्या सेवेमध्ये बदल करीत आहेत.

Flipkart Pay Later

फ्लिपकार्टने सुद्धा आपल्या ग्राहकांसाठी महत्वाची सेवा सुरु केली आहे. यामध्ये ग्राहक उधार सामान/वस्तू खरेदी करू शकतात. परंतु आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि आता, सामान/वस्तू आपण उधार कशी घ्यायची आणि पैसे कसे द्यायचे व कधी द्यायचे?

[irp posts=”843″]

Flipkart Pay Later माध्यमातून आपण टी.व्ही. ,फ्रीज, मोबाईल, घड्याळ इलेक्ट्रिक वस्तू इतर वस्तू घेऊ शकता. यामध्ये ग्राहकाला आवश्यक माहिती व कागदपत्रे द्यावी लागतात. म्हणजेच आपण “Flipkart Pay Later eligible” फ्लिपकार्ट पे लेटर साठी पात्र असणे गरजेचे आहे.

आपण पात्र आहोत का? हे पाहण्यासाठी सर्व प्रथम Flipkart ओपन करा नंतर खालच्या बाजूला काही पर्याय दिसतील. उदा. Home = Categories = Notification = Acccount = Cart हे [पर्याय दिसतील यामधून Account हा पर्याय निवडा.

Credit Options मध्ये Flipkart Pay Later हा ऑप्शन निवडा किंवा आपण https://dl.flipkart.com/s/YIYh01NNNN आवश्यक ती माहिती भरावी. आपण यासाठी पात्र आहात का हे चेक केले जाईल व आपण पात्र आहे का नाही काही कालावधीमध्ये तुम्हाला त्याठिकाणी दिसेल. पात्र असेल तर आपण किती रु. पर्यंत खरेदी करू शकता याची मर्यादासुद्धा त्याठिकाणी दाखवली जाईल.

महत्वाचे : सर्व प्रथम Flipkart Pay Later बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या. कारण आपण जर वेळेवर पेमेंट केले नाही तर तुम्हाला दंडसुद्धा भरावा लागतो. यामुळे आधी संपूर्ण माहिती जाणून घ्यावी नंतरच पुढील प्रोसेस करावी.

आपण वस्तू/सामान खरेदी कसे करावे?

आपण रेग्युलर जशा वस्तू ऑर्डर करतो, त्याचपद्धतीने आपण वस्तू कार्ट (Add Cart) मध्ये जोडा पेमेंट ऑप्शन निवडताना आपल्याला Pay Later ऑप्शन असेल तो निवडावा लागेल. नंतर मोबाईल वरती एक सहा अंकी ओटीपी येईल हा व्हेरीफाय झाल्यानंतरच ऑर्डर कन्फर्म होईल.

[irp posts=”790″]

पैसे कधी भरावे लागतील?

तुम्हाला जर माहिती नसेल कि आपण वस्तू खरेदी केल्यानंतर पैसे कधी भरावे तर आपण अटी व शर्ती समजून घ्याव्यात नंतरच वस्तू खरेदी करावी. यामध्ये कधीही बदल होऊ शकतो त्यामुळे आपण कधी पैसे भरावे या बद्दल माहिती येथे देऊ शकत नाही.

वस्तू खरेदी केल्यानंतर तुम्हाला “Flipkart Pay Later” मध्ये बिल पाहायला मिळेल व त्याठिकाणी पैसे भरण्यासाठी ऑप्शन येईल. आपण युपीआय/UPI, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, ATM कार्ड ने पेमेंट करू शकता.

Similar Posts

Leave a Reply