Fancy Number; नवीन गाडीसाठी VIP/फॅन्सी नंबर असा शोधा
Parivahan Fancy Number : नवीन गाडी घेतल्यानंतर आपल्याला बऱ्याचदा गाडीसाठी पाहिजे तो नंबर किंवा आपल्याला चॉइस नंबर “Fancy Number” घ्यायचा असतो पण तो उपलब्ध आहे का? हे आपल्याला माहिती नसते.
Parivahan Fancy Number
अशा वेळेस आपण काय करतो RTO ऑफिसला जाऊन चौकशी करतो. परंतु मित्रांनो आपण मोबाईलवरून घरबसल्या तुम्हाला जो नंबर हवा आहे तो काही मिनिटामध्ये चेक करू शकता.
व्हीआयपी नंबर असो किंवा इतर कोणताही नंबर तो उपलब्ध आहे किंवा नाही? उपलब्ध असेल तर त्यासाठी तुम्हाला किती पैसे भरावे लागतील याचीसुद्धा माहिती तुम्हाला मोबाईल वरती मिळेल. या लेखा मध्ये आम्ही तुम्हाला नंबर “Parivahan Fancy Number” शोधण्याची संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहोत.
RTO maharashtra choice number list
- चॉइस नंबर मोबाईलवरून शोधण्यासाठी सर्वप्रथम मोबाईलमध्ये “fancy parivahan” https://fancy.parivahan.gov.in/ हि वेबसाईट ओपन करावी.
- साईट ओपन झाल्यानंतर खाली दाखवलेल्या फोटोप्रमाणे पर्याय दिसतील.
- वरती दाखवल्या प्रमाणे तुम्हाला मेन्यू पर्यायाम्ध्ये Search By/Number आणि User Other Services हे पर्याय पाहायला मिळतील.
- Search By/Number यामध्ये तुम्हाला जो नंबर हवा आहे तो उपलब्ध आहे किंवा नाही हे पाहायला मिळेल.
- User Other Services वरती क्लिक केल्यावर Check Availability fancy/choice number या पर्यायवर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला राज्य आणि RTO चे नाव निवडण्यासाठी ऑप्शन असतील. त्यामधून आपले राज्य आणि आरटीओ चे नाव निवडा.
- संपूर्ण चॉइस/फॅन्सी नंबरची यादी तुम्हाला पाहायला मिळेल. नंबर अमोर त्याची किंमतसुद्धा आहे.
- Registration mark of choice खालील चौकोनामध्ये नंबर हवा असलेला नंबर उदा.4545 टाकावा. नंबर उपलब्ध असेल तर लिस्ट मध्ये दाखवला जाईल.
अशा प्रकारे तुम्हाला नवीन गाडीसाठी हवा असलेला नंबर उपलब्ध आहे का? असेल तर त्यासाठी किती पैसे भरावे लागतील याची संपूर्ण माहिती मोबाईल वर पाहू शकता.