आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक कसा करायचा
Aadhar Card Mobile Number Update : आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे कार्ड आहे. तसेच आधार कार्ड आपल्या ओळखीचा पुरावा आहे. संपूर्ण भारतात आधार कार्ड हे ओळखीचा पुरावा म्हणून वापरले जाते.
Aadhar Card Mobile Number Update
- प्रत्येकाच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक आधार कार्ड धारकाने १० वर्षानंतर आपले आधार कार्ड अपडेट करणे तितकेच महत्वाचे आहे.
- आपल्याला जर PAN कार्ड, मतदान कार्ड, शासकीय दाखले, शासकीय योजनांचे फॉर्म भरायचे असेल तर त्यासाठीसुद्धा आधार कार्ड लागते.
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर आपण अनेक कामे हे घरबसल्या करू शकता. म्हणजेचे ऑनलाईन फॉर्म भरणे, मोबाईल वरून PAN कार्ड काढणे, आधार कार्ड मागविणे,बँकेमध्ये खाते उघडणे इतर महत्वपूर्ण कामे आपण घरबसल्या करू शकतात. यामुळे आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे अत्यंत महत्वाचे आहे.“Aadhar Card“
आधार कार्डला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा?
मित्रांनो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तर आपण स्वतः मोबाईल वरून करू शकत नाही. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी तुम्हाला अधिकृत आधार केंद्रावर जाऊन लिंक करावा लागेल.
यासाठी आधार केंद्र ठिकाणी जाऊन आपले आधार कार्ड बायोमेट्रिक अपडेट करावे लागेल. अपडेट करतेवेळी आपण आपला मोबाईल नंबर व ई मेल आयडी जोडू शकता. मोबाईलवरून नंबर लिंक करता येत नाही. तसेच मोबाईल नंबर बदलता येत नाही.